Just another WordPress site

भारत जोडो पदयात्रेत राहुल गांधी यांना शिरीष चौधरी यांच्याकडून स्मरणीका भेट

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

भारत जोडो पदयात्रेत दि. २०/११/२०२२ रोजी खा.राहुल गांधी व रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची भेट झाली यावेळी पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालतांना त्यांनी फैजपुर अधिवेशन,त्याची तयारी,त्यात संमत केलेले ठराव व त्यांच्या महत्वाची माहीती देणारी पुस्तिका भेट म्हणुन दिली.प्रसंगी १९३६ ला पंडित नेहरूजी व १९८८ ला फैजपुर कांग्रेसच्या सुवर्ण महोत्सवा प्रसंगी देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधीनी प्रज्वलित केलेली ध्वजज्योती त्यांनी आता पुनः प्रज्वलित करावी अशी विनंती आमदार चौधरी यांनी यावेळी केली.

१९३६ च्या अधिवेशात स्व.धनाजी नाना चौधरी यांनी नियोजनबध्द आयोजन केले होते.पू.साने गुरूजींनी मुंबई पासुन पायी चालत फैजपुरला ध्वजज्योती आणली होती ती ज्योत म्हणजे राष्ट्रसेवेचे प्रतिक होती.अधिवेशनाचे उद्घाटन पंडित जवाहर लाल नेहरूंनी ध्वजज्योत प्रज्वलित करून केले.राष्ट्रसेवेची भावना स्वतः महात्मा गाँधी,पंडित जवाहरलाल नेहरू,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल,नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी ग्रामीण भागातल्या हजारो लोकांच्या मनात जागृत केली.पुढे १९८८ मध्ये लोकसेवक मधुकरराव चौधरी ह्यांच्या कल्पनेतून फैजपुर येथे १९३६ च्या अधिवेशनच्या सुवर्णमहोत्सवानिमीत्त तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि पत्नी श्रीमती सोनिया गांधी ह्यांच्या उपस्थितीत फैजपुर येथे पुनः ध्वजज्योती प्रज्वलित करून तेथे असलेले छत्रपति शिवाजी महाराज महाद्वार व प्रेरणास्तंभाचे लोकार्पण केले आणि आता त्याच परंपरेचे पाईक खा.राहुल गांधींनी आपला भारत देश पुनःच एकदा जोडण्याच्या,हिंसा-अधर्म नष्ट करण्याच्या,तानाशाही व मनमानी राज्यकारभार संपुष्टित आणण्याच्या व सामान्य- गोर गरीब जनेला न्याय मिळवुन देण्याच्या निर्धाराने ती ज्योत प्रज्वलित करून जनतेच मन जागृत करायला पुढील प्रवासाला प्रारंभ केला.

मी आपल्या रावेर यावल विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधि आणि एक राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणुन मी ते अधिवेशन घडवुन आणणाऱ्या सर्व महात्म्याना अभिवादन करतो.आम्हा सर्वाना राहुल गांधींचा अभिमान आहे त्यांच्या नेतृत्वात ह्या गांधीवादी विचारधारेला अधिक बळ मिळो व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला सक्रिय राजकारणात जनेसेवची संधी मिळो ह्याच शुभेच्छा आ.शिरीष चौधरी यांनी दिल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.