Just another WordPress site

“उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत”!

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आणि १० अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर आज शिंदे आपल्या आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत.अजूनही शिंदे आणि ठाकरे गटातील नेते टीका करत असून शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत त्यामुळे चांगली लोक हळूहळू दूर जातील असा टोला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.

प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की,उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या गोंधळ सुरु आहे.ज्या ठिकाणी मुर्खांचा बाजार भरतो त्या ठिकाणी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही.आता तिथे सर्व उपरे लोक भरले आहेत.नुकताच जाधव यांनी एक दावाही केला होता.ते म्हणाले होते की,ठाकरे गटातील उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील.यासोबतच ठाकरे गटातील उर्वरित पाचपैकी तीन खासदारही शिंदेंसोबत येतील.अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत असे जाधव यांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.