पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ई-केवायसी करणे बंधनकारक; ७ सप्टेंबर २२ पूर्वी न केल्यास लाभ मिळणार नाही
जळगाव-पोलिसनायक (प्रतिनिधी):-केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजना हि शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या मार्फत शेतकरी बांधवांना प्रति हप्ता रु.२०००/-इतके अनुदान वाटप केले जाते.सदरील योजनेचा लाभ मिळण्याकरिता यापुढे शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सदरील ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच केंद्र सरकारकडून १२ वा हप्ता हा वितरित केला जाणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २२ पुर्वी ई-केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
केंद्रा सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हप्ता २००० रु. देण्यात येतो.परंतु आता सदरील योजनेचा लाभ मिळण्यासाठी यापुढे शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेअसल्याने शेतकऱ्यांनी ते करून घेणे महत्वाचे आहे.जे शेतकरी ई-केवायसी करणार नाही त्यांना केंद्र सरकारकडून मिळणारा १२ व हप्ता मिळणार नाही.सदरील ई-केवायसी हि स्वतःच्या मोबाईलवरून अथवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन करता येणार आहे.ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी दार प्रति बायोमोट्रिक रक्कम १५ रुपये मात्र निश्चित करण्यात आली आहे.तरी शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २२ पुर्वी ई-केवायसी करून घ्यावे न केल्यास केंद्र सरकारकडून दि.२५ सप्टेंबर २२ रोजी वाटप होणार पुढील हप्ता मिळणार नाही. तरी शेतकऱ्यांनी न चुकता लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.