मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.त्यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार आणि बंडखोर आमदारांना ४० रेडे म्हटले आहे ते बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.दरम्यान त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचाही समाचार घेतला.शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले,भाजपा हा आता आयात पक्ष झाला आहे.हा पक्ष आहे की चोरबाजार?स्वत:कडे काहीच शिल्लक राहीले नाही म्हणून ते सगळे बाहेरून चोरून घेत आहेत त्यामुळे मी ४० रेडे किंवा ४० गद्दारांना प्रश्न विचारतोय की त्यांच्यामध्ये अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावे की ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाहीत.मिंधे गटाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव आणि चेहरा पाहिजे शिवसेनेचे नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे मग तुमची मेहनत कुठे आहे?असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.