यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथील राहणाऱ्या एका महिलेस मोबाईल वरून शिवीगाळ केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील साकळी येथील रहिवाशी जयश्री गोकुळ अडकमोल वय २८ वर्ष हि महिला आपल्या घरात करीत असतांना त्यांना मोबाइल क्रमांक ७८८७५८५६८ या मोबाइलवरून एका अज्ञात वक्तीने कॉल केला दरम्यान जयश्री अडकमोल यांनी संबधीत फोन करणाऱ्यास आपण कोण बोलत आहे असे विचारले असता फोन करणाऱ्या त्या व्याक्तिने नांव न सांगितल्याने महीलेने त्यास पुन्हा आपण कोण असे त्या व्यक्तीस विचारणा केल्यावर त्या व्याक्तीने कुठलेही कारण नसतांना फोन स्विकारणाऱ्या महिलेस अर्वाच्य शिवीगाळ केली.याबाबत जयश्री अडकमोल यांनी यावल पोलीस ठाण्यात त्या मोबाईलवरून शिविगाळ करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दिल्याने सदरील अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत आहे.सदरील अज्ञात मोबाईलचे लोकेशन हे मध्यप्रदेशातील दुर्ग येथील आढळून आले असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.