Just another WordPress site

हिंगोणा येथील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाला श्रद्धांजली अर्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

मुंबई येथील २६/११ रोजी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान स्व.मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या शहीद स्मारकावर आजी माजी सैनिक व गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तालुक्यातील हिंगोणा येथील रहीवासी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांचा मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज (सिएसटी)रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर कार्यरत असतांना चौदा वर्षापुर्वी २६/११च्या दहशदवादी हल्यात नागरीकांचे रक्षण करतांना दहशदवाद्यांशी लढतांना गोळी लागून वीरमरण आले होते.अशा या देशासाठी आपले बलीदान देणाऱ्या शहीद जवानाला काल दि.२६ रोजी त्यांच्या मुळ हिंगोणा गावातील त्यांच्या शहीद स्मारकावर भावपुर्ण श्रद्धांजली वाहन्यात आली.यावेळी दहिगाव येथील पैरामिलेट्री फोर्स वेलफेअर एसोशिएशन यावल तालुका अध्यक्ष राजेश जगताप,उपाध्यक्ष व माजी सैनिक सौखेडासिमचे अय्युब तडवी,सचिव माजी सैनिक मोहन येऊल यांचेसह परिसरातील आजी माजी सैनिकांसह हिंगोणा ग्रामपंचायतचे सदस्य शांताराम तायडे,छबू तडवी,जावेद तडवी यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.