Just another WordPress site

पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी !!

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

पाणी प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी व मोर्चे काढण्यात येत आहेत.तिकोंडी येथे शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन करणारा फलक वेशीवर लावण्यात आला.रविवारी सकाळी उमराणी येथे सर्वपक्षीय बैठकीत सहा महिन्यात पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.तिकोंडी येथे काही ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहे असे सांगत फलक घेऊन फेरी काढण्यात आली.आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत असेही ग्रामस्थ म्हणत आहे.गावातील वेशीवरच्या स्वागत कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोटो असलेला फलक लावण्यात आला होता.काही काळानंतर हा फलक काढून टाकण्यात आला.

महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सोई सुविधा व अनुदान देत आहे तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार असे गेल्या ४ दशकापासून वारंवार आश्वासन देत आहेत याच मुद्द्यावर निवडणूक लढवल्या आहेत तसेच पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. आम्हाला महाराष्ट्र कोणतीही सुविधा देत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावातील कमानीवर बोम्मईंचे छायाचित्र असलेला व कन्नड भाषेत आभार मानण्यात आल्याचा फलक लावण्यात आल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून फलक ताब्यात घेतला.दरम्यान उमराणी येथेही रविवारी सकाळी सर्वपक्षिय बैठक झाली.या बैठकीत राज्य शासनाला निर्वाणीचा इषारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.