यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील आडगाव येथील राहणाऱ्या एका १७ वर्षी अल्पवयीन तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या तरूणांवर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील आडगाव येथील बिडगाव मोहरद मार्गावरील रस्त्यावर फिर्यादी अल्पवयीन तरुणी ही दिनांक २५ च्या सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रीणीसह शौचालयास गेली असता गावातीलच राहणाऱ्या जावेद समशेर तडवी या तरुणाने तरुणीचे हात पकडून माझ्या घरी जेवणात चाल असे म्हटले व तिला अश्लील शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला.या संदर्भात झालेल्या प्रकाराची माहिती या अल्पवयीन तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यावर पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरुणा विरुद्ध दिनांक २६ नॉव्हेबर रोजी फिर्याद दाखल केल्याने यावल पोलिसात त्या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.