मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केंद्रावर जोरदार टीका केली आहे.देशातील वाढत्या बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.हि बेरोजगारीची भेसुर परिस्थिती जनतेसमोर खुल्या दिलाने मांडण्याऐवजी देशात सर्व काही आलबेल असल्याची परिस्थिती निर्माण करून आता फक्त देशात सोन्याचा धुर निघायचा तेवढा बाकी राहिलाय,अशा स्वप्नाळू दुनियेची सैर देशवासीयांना घडविली जात असल्याची टीका यात करण्यात आली आहे.
देशात दिवसेंदिवस बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करीत असून बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगाराकरिता वणवण भटकण्याची पाळी आलेली आहे.परंतु सरकारी वा खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.देशातील बेरोजगारीविषयीचा भयावह स्थिती मांडणारा ताजा अहवाल सीएमआयई अर्थात सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनामि या संस्थेने जरी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात देशातील बेरोजगारीच्या दराने नवा उच्चान्क गाठला असून तो ८.३ टक्क्यावर पोहचला आहे.जुलै महिन्यात हा दर ६.८ असा होता.देशाची लोकसंख्या वाढत असतांना रोजगाराची संधी हि वाढायला हवी मात्र तसे होत नसल्याचे चित्र देशभरात पहायला मिळत आहे.अशा परिस्थिती सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी जायचे कुठे असा सवाल शिवसेनेने केला आहे.