यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि.२८ नोव्हेंबर सोमवार रोजी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नवाज तडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य खुशाल कोळी हे होते.प्रसंगी या अभिवादन सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष नवाज तडवी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच उपस्थितांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्रियांच्या शिक्षणाकरिता घेतलेले परिश्रम याबाबत माहिती दिली.तर सरपंच नवाज तडवी व प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य खुशाल कोळी यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणात त्यांचे महत्वपूर्ण योगदान,स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव नाहीसा करण्याकरिता दिलेले योगदान,स्त्रीशिक्षणाची रोवलेली मुहर्तमेढ याबाबत मोनोगतातून माहिती दिली.यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.