यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील कोरपावली-विरावली रस्त्यावर आज दि.२८ रोजी झालेल्या अपघातात कारने पायी जाणाऱ्या तरुणास धडक दिल्याने सदरील पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.फिरोज लतीफ तडवी वय-४८ वर्षे राहणार कोरपावली असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील कोरपावली येथील रहिवाशी फिरोज लतीफ तडवी वय-४८ वर्षे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारीत असतात.आज दि.२८नॉव्हेबर रोजी कोरपावली ते विरावली मार्गावरील रस्त्यावर दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातुन ऑपेरिक्शाने कोरपावली-विरावली गावादरम्यान एका शेतात आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी येत असतांना यावल कडुन मोहराळाकडे जाणाऱ्या वॅगेनआर कंपनीची एमएच १९डी व्ही ७२२९ या कारने अचानक धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात फिरोज तडवी यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाली.यावेळी त्यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले मात्र तडवी यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना भुसावळजवळ वाटेतच फिरोज तडवी यांचा मृत्यू झाला.सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घरातील कमवता व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे फिरोज तडवी यांच्या परिवाराचा संसार उघड्यावर पडण्याची पाळी आली आहे.सदरहू त्यांच्या कुटुंबाला भरीव अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी परिसरातून केली जात आहे.