Just another WordPress site

“महिलांनी कपडे नाही घातले तरी चांगल्या दिसतात..!!” विधानाबाबत बाबा रामदेव यांची माफी

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

योगगुरु बाबा रामदेव हे अनेकवेळा त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत राहिले आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ते अडचणीत सापडले आहे.यासंदर्भात राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली होती. याप्रकरणी आता बाबा रामदेव यांनी माफी मागितली आहे.याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की,बाबा रामदेव यांचा खुलासा काल राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाला आहे.त्यामध्ये आम्ही ‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’ यामाध्यमातून महिलांसाठी काम करतो.आमची संस्था ही महिलांचा सन्मान करणारी आहे.ठाण्याच्या कार्यक्रमात मी एक तास बोलत होतो.माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला.मला जे बोलायचे नव्हते असा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो असे बाबा रामदेव यांनी महिला आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटल्याचे रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच रुपाली चाकणकर यांनी ट्विटही केले आहे त्यात म्हटले की,बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते.या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती.याबाबत त्यांचा खुलासा कार्यालयाला प्राप्त झाला असून,केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे असे चाकणकर यांनी सांगितले आहे.शुक्रवारी बाबा रामदेव यांनी ठाण्यात घेतलेल्या योग शिबिरामध्ये हा सगळा प्रकार घडला.यावेळी अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी हे विधान केले होते.अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत कारण त्या नेहमी आनंदी राहतात.जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे असे बाबा रामदेव म्हणाले होते.यानंतर पुढे बोलताना त्यांनी,महिला साडी नेसल्यावर,सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात असे आक्षेपार्ह विधान केले आणि वादाला सुरुवात झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.