Just another WordPress site

धावत्या लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला

अहमदाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.या प्रवाशाला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता पोलिसांनी त्याला मृत घोषित केले.घाटकोपर येथून निघालेली ही बस उदयपूर येथे जात असतांना चारोटी जवळ ही घटना उघडकीस आली.स्लिपर कोच असणाऱ्या या बस मध्ये घोडबंदर येथून हा प्रवासी चढला.

डहाणू तालुक्यातील चारोटी नाक्याच्या पुढे लघवी करण्यासाठी अन्य प्रवासी बस मधून खाली उतरला असता त्याच्या बुटाला रक्त लागल्याने शोध घेतल्याच्या प्रक्रियेत एक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बस वळवली मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले.या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले आहे.कासा पोलीसांकडून या प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याच्या खिशात काही ब्लेड सापडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.