सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या माळसिरस तालुक्यात एका विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.वधू आणि वर एकमेकांना वरमाला घालून लग्नबंधनात अडकतात भारतात अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे.पण अकलूज मधील दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केल्याने या विवाहाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.माळशिरस तालु्क्यातील अतुल नावाच्या तरुणासोबत दोन बहिणींनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र कांदिवलीत राहणाऱ्या रिंकी आणि पिंकी या दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणे या नवरदेवाला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे कारण आयपीसीच्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.राहुल नावाच्या व्यक्तीने यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
अकलुज येथील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात हा विविह सोहळा पार पडला.रिंकी आणि पिंकीने अतुलसोबत अनोखा विवाह केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.अतुल माळशिरस तालुक्यातील रहिवासी असून मुंबईत त्याचा व्यवसाय आहे तर या दोघी बहिणी उच्चशिक्षित असून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.रिंकी आणि पिंकीच्या आई आजारी असताना अतुलने सांभाळ केला त्यानंतर दोघींचे अतुलसोबतचे प्रेमसंबंध घट्ट झाले आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला अशीही माहिती आहे.दोन्ही बहिणी एकमेकिंची काळजी घेतात त्यामुळे दोघींनी वेगवेगळे विवाह करण्याचे ठरवले नव्हतं शेवटी त्यांनी एकाच तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.परंतु हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याची चर्चा असल्याने याला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.