अमित शाह मुंबई दौऱ्यावर ; गणेश दर्शन व नेत्यांच्या गाठीभेटीसह विविध कार्यक्रम
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांच्या दौरा महत्वपूर्ण
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-केंद्रीय मंत्री अमित शहा आज दि.५ रोजी मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.गणेशोत्सवानिमित्त शहा लालबागचा गणपती राजा यांचे दर्शन घेण्याकरिता मुंबईत आले आहेत.मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकार झाल्यापासून प्रथमच शहा मुंबई भेटीवर आले आहेत.त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणूका होणार असल्याने अमित शहा यांच्या मुंबई दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
या भेटीदरम्यान सकाळी ९ वाजता दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची भेट,स.१० वाजता सह्याद्री गेस्ट हाऊस वरून लालबाग कडे १०.३०वाजता लालबागच्या गणपतिराज्याचे दर्शन,११.१५ वाजता वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट,दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट व भाजप पदाधिकारी यांच्या सोबत बैठक, दुपारी २.१५वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट, दुपारी३.३५वाजता नायक चँरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम,संध्याकाळी ५.५० वाजता मुंबई विमानतळावरुन दिल्लीला रवाना असा अमीत शहा यांचा धावता दौरा राहणार आहे.
खरे पाहता अमीत शहा हे मुंबईत लालबागच्या गणपती राजाचे दर्शन घ्यायला आले आहेत. परंतु आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्याने याबाबत राजकीय खलबतांना वेग येणार आहे.अलीकडेच भाजपने आपले मिशन मुंबई जाहीर केले असून मुंबई महापालिकेवर आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. त्यातच शिंदे गटामुळे भाजप ची ताकद वाढली आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप सोबत काही दिवसापासून जवळीक पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप,शिंदे गट व मनसे एकत्रित आल्यास त्याचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत होणार आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा हा महत्वपूर्ण मानला जात आहे.