Just another WordPress site

डोंगर कठोरा व दहिवद आश्रमशाळांना आदीवासी विभागाव्दारे भोजन कक्षाला मान्यता

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आदीवासी आश्रम शाळा डोंगर कठोरा ता.यावल व दहिवद ता.चोपडा येथे जळगाव जिल्ह्यात दोन मध्यावर्ती भोजन कक्षाला (सेमी किचन केन्द्रास ) मान्यता मिळाली असल्याची माहीती एकात्मीक आदीवासी विकास विभागाच्या सुत्राकडुन देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,यावल येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकुण १७ शासकीय आश्रमशाळांचा समावेश आहे.या आदीवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाने आश्रमशाळाच्या माध्यमातुन दाखविण्यात येणारी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या तसेच अत्यंत निकृष्ठ प्रतिचा पोषण आहार दिले जातात अशा अनेक तक्रारी करण्यात येत होत्या या पार्श्वभुमीवर केन्द्र शासनाने एक महत्वाचे निर्णय घेत आता आदीवासी विद्यार्थ्यांना स्वादीष्ठ व चांगल्या प्रतीचे दोन वेळेचे भोजन हे विद्यार्थ्यांना मिळाणार असल्याने या उद्दीष्ठाने सेन्ट्रल भोजन कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे.या मध्यावर्ती भोजन कक्षासाठी जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा तालुका यावल व दहिवद तालुका चोपडा या आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे.

मध्यावर्ती भोजन कक्ष माध्यमातुन दोन तासाच्या आत कक्षाशी जोडण्यात आलेल्या शासकीय आश्रमशाळा डोंगर कठोरा तालुका यावल, वाघझीरा तालुका यावलची शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमीक आश्रमशाळा,मालोद तालुका यावल येथील शासकीय आश्रम शाळा, विष्णापुर तालुका चोपडा येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा,कृष्णापुरी तालुका चोपडा शासकीय प्राथमिक आश्रमशाळा,शासकीय माध्यमीक आश्रमशाळा देवझीरी तालुका चोपडा,वैजापुर तालुका चोपडा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, लालमाती तालुका रावेर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथील शासकीय आश्रमशाळा,गंगापुरी तालुका जामनेर येथील शासकीय माध्यमीक आश्रमशाळा,जोंधनखेडा तालुका मुक्ताईनगरची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडा व दहिवद येथील शासकीय आश्रमशाळा,चांदसर तालुका धरणगावची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,सोनबड्री तालुका एरंडोल येथील शासकीय माध्यमीक आश्रमशाळा,सार्वे तालुका पाचोरा व पळासखेडा तालुका बोदवड येथील शासकीय माध्यमीक आश्रमशाळांसह एकुण १७ शाळांचा यात समावेश करण्यात आले आहे.

यात निवासी विद्यार्थी मंजुर क्षमता मुले ३ हजार १०० तर मुली ३ हजार ६६० अशी एकुण संख्या ६ हजार ७६० अशी आहे.सन२०२२ते २०२३या शैक्षणीक वर्षासाठीच्या विद्यार्थी पटसंख्या पुढील प्रमाणे विद्यार्थीनी मुली २ हजार ६६७ तर मुलांची २ हजार ५७४ अशी  एकुण विद्यार्थी पटसंख्या ही ५ हजार २४१ आहे.यात सर्वाधीक विद्यार्थी पटसंख्या असलेली आश्नमशाळा ही चोपडा तालुक्यातील देवझिरी ५८५,कुष्णापुर ४२८ आणी यावल तालुक्यातील वाघझीरा ४२७ शाळांचा समावेश आहे.जळगाव जिल्ह्यातील या मध्यावर्ती भोजन कक्षाच्या उभारणी कामाला गती मिळाली असुन येत्या तिन ते चार महीन्याच्या कालावधीत सदरचे काम पुर्णत्वास जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.