Just another WordPress site

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे शिवाजी महाराजांना पत्र

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणाऱ्यांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.त्यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहले असून त्यातून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.“महाराज… तुमचा वंशज म्हणून नाही तर मावळा म्हणून बोलतो आहे,विचारांची कडेलोट होण्याची वेळ आली आहे म्हणून व्यथा मांडतोय,काही लोकांच्या डोक्यात खोटा मेंदू हि वीकृती दिसू लागली आहे.महाराज मी वचन देतो तुमचा आणि महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही,”असे उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

उदयनराजेंनी आपले हे पत्र ट्विट केले असून त्यांनी पत्रात लिहले आहे की,आज खूप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची,आम्ही आपल्याशी अंश वंश नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून,एक शिवभक्त म्हणून बोलतोय.आपण स्वराज्याचा पाया रचला.त्याला पावणेचारशे वर्षे झाली.एवढ्या वर्षात आम्हाला कुणाला आपल्याकडे वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाही.कारण आपण रयतेसाठी इतके मोठे स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र आपला हिंदुस्थान आपण घालून दिलेल्या आदर्शांवर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता.अलिकडच्या काळात हद्द झाली.विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय?अशी रास्त भीती निर्माण झाली आहे.अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेवून निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय? असा विचार येवून मन विषण्ण झाले म्हणूनच फक्त मनमोकळ करायला लिहितोय,मनोमन समक्ष उपस्थित राहुन हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो.सगळीकडेच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचे कुठे?व्यथा मांडायची कुठे?सगळे दिशाहीन झाले आहे,एकही विश्वासार्थ ठिकाण राहिले नाही म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय महाराज.

Leave A Reply

Your email address will not be published.