Just another WordPress site

अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेचेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

तालुक्यातील गिरडगाव येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.शनिवार दि.३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचा खान्देश विभागीय मेळावा अमळनेर येथील मंगळग्रह मंदीरावर संपन्न झाला.या मेळाव्यात पोलीस पाटील संघाचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या हस्ते तसेच राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंन्द्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक पाटील यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघाचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंन्द्र शिंदे हे यावेळी उपस्थीत होते.या विभागीय मेळाव्यात प्रामुख्याने दि.१९ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधीवेशनावर दि.२२ रोजी पोलिस पाटील संघटनेचा मोर्चो जाणार असुन त्यात पोलीस पाटील यांना सध्या ६५०० मानधन मिळत असून ते १५००० रुपये मिळावे व ३००० रुपये सादील खर्च वेगळा मिळावा तसेच पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्तीचे वय ६०
वर्षा वरून ६५ वर्षे करण्यात यावे.नूतनी करण कायमचे बंद करावे तसेच मेडिक्लेमही लागू करावा व उच्चशिक्षित पोलीस पाटलांना शासकीय सेवेत १०% आरक्षण मिळावे आदी मागण्यांसंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे यासह पोलीस पाटील यांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तर पो.पा.संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी यावल तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष व गिरडगावचे पो.पा.अशोक रघुनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.आपल्या लक्ष वेधणाऱ्या कार्येशैलीने पो.पा.संघटनेचे जे कार्ये अशोक पाटील करीत आहेत त्याची दखल घेत
त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली.तर आपल्यावर सोपवलेली संघटनेची कार्यध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आपण सर्व सहकारी मित्रांना विश्वासात घेऊनच उत्कृष्टपणे पार करू असे यावेळी अशोक पाटील यांनी सांगितले आहे.या विभा गीय मेळाव्यात पो.पा.संघटनेचे धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व यावल तालुक्यातील नायगाव येथील पो.पा.मनोज देशमुख,पाडळसा पो.पा.सुरेश खैरनार,डोंगरकठोरा पो.पा.राजरत्न आढाळे,बोरावल खुर्द पो.पा.गोकुळ पाटील,बोरावल बुद्रूक पो.पा.किरण पाटील,भालोद पो.पा.लक्ष्मण लोखंडे,कासवा पो.पा.कैलास बादशहा आदींसह पोलीस पाटील संघटनेचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.