Just another WordPress site

पुष्पलता काछवाल यांच्या निधनानिमित्ताने कीर्तन व पगडी कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

म्हाडा कॉलनी जळगाव येथील रहिवाशी स्व.श्री रमेशचंद्रजी जगन्नाथजी शर्मा (काछवाल) यांच्या धर्मपत्नी  तसेच हेमंत शर्मा,सचिन शर्मा व राहुल शर्मा यांच्या मातोश्री  श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा (काछवाल) यांचे मार्गशीर्ष वद्य ५ सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२रोजी वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले होते. श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा (काछवाल) यांच्या निधनाप्रीत्यर्थ गुरुवार दि.८ व ९ डिसेंबर २०२२ रोजी कीर्तनादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे कि,जळगाव येथील म्हाडा कॉलनीतील रहिवाशी हेमंत शर्मा,सचिन शर्मा व राहुल शर्मा यांच्या मातोश्री व स्व.श्री रमेशचंद्रजी जगन्नाथजी शर्मा (काछवाल) यांच्या धर्मपत्नी तसेच मिश्रीलाल शर्मा व शांतिलाल शर्मा यांच्या वहिनी श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा (काछवाल) यांचे दि.२८ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले होते.श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा यांच्या निधनानिमित्ताने दि.८ डिसेंबर २२ रोजी कीर्तन कार्यक्रम व ९ डिसेंबर २२ रोजी दुपारी ३ वाजता स्थळ-म्हाडा कॉलनी,मुक्ताई कॉलेज जवळ,सुरत रेल्वे गेट जवळ जळगाव येथे बारवा तथा पगडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी या कार्यक्रमाचा नातेवाईक,मित्रमंडळी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन मिश्रीलाल शर्मा,शांतिलाल शर्मा,हेमंत शर्मा,सचिन शर्मा व राहुल शर्मा तथा समस्त शर्मा (काछवाल) परिवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.