तरुणीवर ॲसिड टाकून तिला जीवे मारण्याची धमकी डेक्कन जिमखाना भागात परिसरात घडली.याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी ओंकार शिंगारे,सागर शिंगारे यांच्यासह त्यांच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी ओंकार शिंगारे तरुणीच्या ओळखीचा आहे.
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ओंकार हा तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत होता.ओंकारने तरुणीला प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी धमकावले होते. प्रभात रस्ता परिसरातून निघालेल्या तरुणीला त्याने अडवले.प्रेमसंबंधास नकार दिल्याने चिडलेल्या ओंकारने तरुणीवर ॲसिड टाकून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर आरोपी सागर आणि त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारु अशी धमकी तरुणीला दिली. पोलीस उपनिरीक्षक कवटीकवार तपास करत आहेत.