मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा,काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली मात्र निकालात भाजपाला मोठे यश मिळताना दिसत आहे यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले ते आज ८ डिसेंबर रोजी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.एकनाथ शिंदे म्हणाले,मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी,गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे.भाजपाला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो.