Just another WordPress site

वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा-अजित पवारांचे सूचक विधान

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच भेट होऊन चर्चा झाली ही चर्चा सकारात्मक झाली असून वंचित महाविकास आघाडीत सहभागी होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.दरम्यान वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या संमतीचीही आवश्यकता आहे.यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अजित पवार यांनी वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे महाराष्ट्रात आता नवे राजकीय समीकरण पाहायला मिळू शकते.जे समविचारी पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे.उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण आणि भाई जगताप यांना विचारणा केली तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मी आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली आहे.आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे.आम्ही याबाबत सकारात्मक आहोत असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या आधीच शिवसेनेबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून त्याबाबत प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते.त्यानंतर नुकतीच उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाल्याने युतीच्या चर्चेला आणखी वेग आल्याचे मानले जाते.ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्राकडून देण्यात आली.प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा सकारात्मक झाली आहे.काही विषयांवर अजून चर्चा सुरू आहे पण लवकरच अंतिम निर्णय होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का?या प्रश्नावर त्यांची तशी तयारी असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.