अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाधून बोगस लग्न लावल्याचा आरोप त्यांच्या माजी स्वीय्य सहाय्यकाने केला आहे यामुळे दीपाली सय्यद या चर्चेत आल्या आहेत.भाऊसाहेब शिंदे यांनी केलेले सर्व आरोप दीपाली सय्यद यांनी फेटाळले आहे नुकतेच त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.दीपाली सय्यद यांनी नुकतच ‘एबीपी माझा’वर प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी ‘भाऊसाहेब शिंदे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत असे त्या म्हणाल्या.त्याबरोबर“मी त्यांना ट्रस्टवरुन बाजूला केल्याचा राग मनात धरुन माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत असे दीपाली सय्यद म्हणाल्या.
माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर झालेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत.ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्यांना माझ्या नावावर पैसे घेताना मी पकडले आहे त्यामुळे मी त्यांना ट्रस्टवरुन बाजूला केले हाच राग मनात धरून माझ्यावर आरोप करण्यात आले.मी याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहे असे दीपाली सय्यदने म्हटले आहे.दीपाली भोसले यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ९-९-२०२१ साली सांगलीत बोगस लग्न लावण्यात आली.२०१६ रोजी एका दाम्पत्याचे लग्न झाले होते त्यांना २०१८ साली अपत्य झाले पण त्यांचा विवाह दीपाली सय्यद आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा २०२१ साली लावला.बोगस कामांसाठी राज्यपाल कोश्यारी दीपाली सय्यद यांना सहकार्य करतात.दीपाली सय्यद यांच्यावर राज्यपाल का मेहेरबान आहेत याची चौकशी राज्य शासनाने करावी अशी मागणीही भाऊसाहेब शिंदे यांनी केली होती.
दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सय्यद यांनी हजारो कोटी रुपयांचे वाटप केले पण ऑडिट रिपोर्ट मिळाल्यावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटमध्ये फक्त ९ हजार १८२ रुपये आढळून आले मग बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कोणी दिली आणि कुठून आणली याची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी.जर ही चौकशी झाली नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासमोर आत्मदहन करु असा इशारा माजी स्वीय्य सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.