Just another WordPress site

डोंगर कठोरा ग्रामपंचायततर्फे शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार

ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने गावातील विविध शाळांमधील जवळपास तब्बल ४० शिक्षकांचा यावेळी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच इतक्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला हे विशेष.ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व विद्यमान ग्रा.पं.सदस्य डॉ.राजेंद्र कुमार झांबरे हे होते.या कार्यक्रमाला सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगडे,माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं .सदस्य मनोहर महाजन,ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,हेमलता जावळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,शकीला तडवी,शबनम तडवी,जि.प.शाळा केंद्र प्रमुख महंम्मद तडवी,महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी.भोळे,अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचे मुख्याध्यापक नितीन झांबरे,शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस.एन.वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती राहिली.या प्रसंगी जि.प.मराठी व उर्दू शाळा,अ.ध.चौ.विद्यालय व ज्यु.कॉलेज,महिला महाविद्यालय व शासकीय आदिवासी शाळा या शाळांमधील तब्बल ४० शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ४० वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांचा सन्मान व सत्कार करणारे डॉ.रवींद्र राणे यांच्या हस्ते यावेळीदेखील शिक्षकांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.डॉ.राणे यांच्या कार्याबद्दल त्यांचेही कौतुक होत आहे.

यावेळी सरपंच नवाज तडवी,ग्रा.पं.सदस्या कल्पना राणे,सदस्य मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,एम.ए.जंजाळ,हर्षाली जावळे,चारुलता झांबरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे यांनी शिक्षकांचे कार्य व जबाबदारी,विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भुमिका,शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी,पालकांनी शिक्षकांना समजून घेण्याची गरज अशा विषयांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पी.पी.कुयटे यांनी केले.तर प्रास्ताविक ग्रा.पं.सदस्या कल्पना राणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेकरिता सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगडे,माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं .सदस्य मनोहर महाजन,ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,हेमलता जावळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,शकीला तडवी,शबनम तडवी,क्लार्क प्रदीप पाटील,कॉम्पुटर ऑपरेटर कल्पेश कोल्हे,पाणीपुरवठा नोकर सायबु तडवी,खेमचंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.