यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जळगाव जिल्हा सेवा निवृत्त संघाच्या वतीने यावल तालुका सेवा निवृत्त संघाची सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दि.१० डिसेंबर २२ रोजी सकाळी ११ वाजता यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यावल येथे जळगाव जिल्हा सेवा निवृत्त संघाचे अध्यक्ष सदाशिव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर सभेस निरीक्षक म्हणून अय्युबशहा जमलशाह कार्यालय सचिव जिल्हासंघ जळगाव हे हजर राहणार आहेत.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील सभासद बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल तालुका सेवा निवृत्त संघाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील,चिटणीस वसंत गाजरे,उपाध्यक्ष दयाराम चौधरी यांनी केले आहे.