यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-तालुक्यातील नायगाव येथील रहिवाशी दिनेश किसन बैसाणे यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे परिवीक्षणाधिन पोलीस उपअधीक्षक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सदरहू दिनेश बैसाणे हे जळगाव जिल्हयात गणपती बंदोबस्ताकरिता आले असता त्यांचे स्वगृही म्हणजे नायगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले.
यानिमित्ताने नायगाव येथे ढोल ताशांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात आले.याप्रसंगी पोलीस बॉईज असोशिएशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भूषण नगरे,यावल पोलीस स्टेशनचे पीएसआय सुदाम काकडे,पो.कॉ.भुषण चव्हाण,पो.कॉ.निलेश वाघ,एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे संदीप साळवे,नायगावचे सरपंच,पोलीस पाटील,प्रतिष्ठित व्यक्ती,तालुक्यातील मित्रमंडळी,नातेवाईक व समस्त गावकरी यांनी दिनेश बैसाणे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.