Just another WordPress site

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानिमित्ताने नियोजन बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे १० डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्याच्या नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली.यावल येथील शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ येथे यावल तालुका काँग्रेस कमिटीची बैठक लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष तथा जि.प.गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे १० डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असुन यावेळी आगामी काळात होवु घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद,ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पटोले यांचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे.यावेळी नाना पटोले हे विविध विषयांवर तालुका व गावनिहाय बैठका घेऊन पक्षाच्या वतीने आढावा घेणार आहेत.त्या संदर्भात नियोजन करण्याकरिता सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला पंचायत समिती माजी सभापती लीलाधर चौधरी,बाजार समिती माजी सभापती नितीन चौधरी,प.स.गटनेते शेखर पाटील,कॉंग्रेस कमेटी शहराध्यक्ष कदीर खान,जेष्ठनेते जावेद जनाब,फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई,नगरसेवक कलिम भाई,यावल नगरपरिषद माजी गटनेता सय्यद युनूस,माजी नगरसेवक रसूल मेंबर,शेख असलम,समीर मोमीन,वढोदे सरपंच संदीप सोनवणे,मनोहर सोनवणे,समीर खान,खरेदी विक्री सहकारी संघ चेअरमन अमोल भिरुड,युवा नेते धनंजय शिरीष चौधरी,अनिल पाटील,विठ्ठल सूर्यवंशी,अनिल जंजाळे,विवेक सोनार,फैजान शाह,सुनील फिरके,भाऊसाहेब जिया सर,विक्की गजरे,उमेश जावळे,अशपाक शाह,जी.पी.पाटील,इम्रान पहेलवान,उस्मान तडवी,प्रशांत पाटील,चंद्रकला इंगळे,विक्की पाटील,कलीमा तडवी,ससाणे सर,महेश राणे,विक्की सोनवणे,शेख सकलेन,सरफराज शाह यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.