हेडगेवार व गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून खोक्यांच्या स्वरुपात पैसे घेतले-प्रकाश आंबेडकरयांचा उपरोधिक टोला
आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.अशातच काल पैठणमध्ये बोलताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असे विधान होते.दरम्यान या विधानानंतर विरोधकांकडून टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले किंवा भाऊराव पाटील असतील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.मात्र त्यांनी हेडगेवार किंवा गोळवलकरांचे नाव घेतले नाही.याचा अर्थ हेडगेवार आणि गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले नाहीत तर आजच्या भाषेत खोक्यांच्या स्वरुपात पैसे घेतले आणि स्वत:च्या संस्था उभ्या केल्यात.ही कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिल्यामुळे त्यांचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो अशी उपरोधीक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांना शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत बोलताना फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली होती असे विधान केले होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या.डॉ.बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या.त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिले नाही तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली,शाळा चालवतोय पैसे द्या.तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होती.आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत असे ते म्हणाले होते.