Just another WordPress site

शाईफेक प्रकरण:पोलीस आयुक्तांकडून ११ पोलीस कर्मचारी निलंबित

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे.अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी असे एकूण ११ जणांना निलंबित केले आहे.चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली होती.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली.चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला.पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केले होते.चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की,“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिले नाही तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली शाळा चालवतोय पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होती.आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,”असे पाटील म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.