Just another WordPress site

पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या कपाळावर ‘भिकारी’ लिहून बॅनरबाजी

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापले आहे.काल पिंपरी-चिंचवड येथे समता दलाच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक झाल्यानंतर आज पुण्यातील ससून रुग्णालयाजवळ चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.काल पिंपरी-चिंचवडमधल्या शाईफेकीनंतर अनेक आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रकांत पाटील यांना अटक करा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.परंतु त्यापूर्वीच ससून हॉस्पिटलजवळ एक बॅनर लागलेला आहे जो बॅनर सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

बॅनरवर कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या ‘भिकारी’ चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध…असा मजकूर लिहिलेला आहे.तर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेवर फुली मारत त्यांच्या डोक्यावर ‘भिकारी’ लिहिले आहे.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहे.मात्र या बॅनरवर एका अज्ञात व्यक्तीकडून चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेच्या कपाळावर ‘भिकारी’असे लिहिले आहे.यावरून आता पुण्यात नवा वाद रंगताना पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे आजच या ठिकाणी भाजपकडून चंद्रकांत पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येणार असल्याने नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य करण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवले.आज पिंपरीतल्या एका कार्यक्रमाला जात असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी शाईफेक केली.त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या.पोलिसांनी तत्काळ शाईफेक करणाऱ्या अज्ञातांना ताब्यात घेतले आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.
माझ्यावरचा हल्ला म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे.प्रत्येकाने आपले मत मांडायचे,ज्याला आवडले नाही त्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे,बाबासाहेबांनी हे तत्व आयुष्यभर जपले.पण आज माझ्यावर शाई फेकून ही लोकशाही नव्हे तर झुंडशाही असल्याचे विरोधी पक्षांने दाखवून दिले.मी चळवळीतला कार्यकर्ता आहे.माझ्या रक्तात फुले-आंबेडकर आहेत त्यामुळे मी असल्या प्रकारांना घाबरत नाही अस रोखठोक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.