परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंत मुंडे,वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती मुंडे,डॉ केशव मुंडे,डॉ योगेश मल्लुरवार आणि रुग्णालयाच्या परिचारिकांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या जखमींवर उपचार केला.अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.स्कूल बस आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर एसटी बसचा चालक हा केबिनमध्ये अडकला होता.पिंपळदरी पोलिसांनी आणि नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले आहे.त्याला उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.अहमदपूवरून बुलढाण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या चालकाने मद्य सेवन केले असल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.चालकाचे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर चालक दारू पिलेला आहे की नाही याची माहिती समोर येणार आहे.