यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील तालुका विधी सेवा समिती यावल,वकील संघ यावल व वनविभाग यावल यांचे संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम अशा सातपुड्याप पर्वताच्या कुशीत अतिशय दुर्गम अशा काळाडोह भागात आदीवासी पाडयावर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक मराठी शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
यावेळी अॅड.एन एम चौधरी यांनी मुलांचे शिक्षणाचा अधिकार,सायबर कायद्या विषयी माहिती दिली.अॅड ए एम कुलकर्णी यांनी वन कायद्याबाबत तसेच आदिवासी बांधवांकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.सरकारी वकील अॅड फरीद शेख यांनी जामीनबाबत तरतुदिंची माहिती दिली.अॅड एस जि कवडीवाले यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती दिली.सह दिवाणी न्यायाधीश व्ही एस डामरे यांनी नालसा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच यावल वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी वन हक्क कायद्याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष एम एस बनचरे यांनी मानवी हक्कांबाबत माहिती देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अॅड ए आर सुरळकर यांनी तर आभार प्रदर्शन धुळापाड्याचे शिक्षक श्रीकांत मोते यांनी केले.
सदर कार्यक्रमास यावल वकील संघाचे अध्यक्ष अॅड एन पी मोरे,सचिव अॅड डी सि सावकारे,अॅड जि एम बारी,अॅड डी व्ही चौधरी, अॅड व्ही एम परतणे,अॅड आर एन पटेल,अॅड सुलताना तडवी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे,वन विभागाचे कर्मचारी,विधी समांतर सहाय्यक सर्व शशिकांत वारुळकर,हेमंत फेगडे,अजय बढे न्यायालयाचे कर्मचारी सर्वश्री एस एम तेली,गजानन लाड,मुकुल जोशी शाळेचे मुख्याध्यापक हमीद तडवी,जहांगीर तडवी व ग्रामस्थ हजर होते.