यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील होमगार्डस कार्यालयाच्या वतीने होमगार्ड व नागरी संरक्षण दिन साप्ताहिक परेड काढुन उत्साहात साजरा करण्यात आला.जळगाव जिल्हा समादेशक,अप्पर पोलीस अधीक्षक होमगार्डस जळगांव यांच्या आदेशानुसार दिनांक ४ डिसेंबर २२ रोजी होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन ६ डिसेंबर २२ रोजी ७६ वा दिनाचे औचित्य साधुन होमगार्ड पथकाच्या वतीने यावल पोलीस कवायत मैदान येथे व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच साप्ताहिक परेड घेण्यात आली.
आज दि.११ डिसेंबर २२ रोजी वर्धापन दिनानिमीत्त पोलीस ग्राऊन्ड पासुन होमगार्डच्या वतीने गावात बुरुज चौक,खिरनीपुरा,महाजन गल्ली, मेनरोड बारी चौक ते पोलीस ग्रॉऊन्ड पर्यंत रुटमार्च काढण्यात आला.तसेच होमगार्ड वर्धापन दिनानिमीत्त सर्व होमगार्डस यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या त्यांचे कर्तव्य जबाबदारीचे योगदान यांची जाणीव याबाबत माहिती देण्यात आली.या प्रसंगी प्र.समादेशक भानुदास कवडीवाले,रमेश चौधरी,पंकज फिरके,विजय जावरे पलटन नायक असे ४८ पुरुष व ९ महिला असे एकूण ५७ होमगार्ड यांनी या परेड व विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला.यावेळी होमगार्ड भगवान पाटील,नथ्थु महाजन,कैलास लावणे यांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले.होमगार्ड व संरक्षण वर्धापन दिनानिमित्ताचे आयोजीत सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी समदेशक भानुदास कवडीवाले व पलटन नायक विजय जावरे व त्यांचे सर्व होमगार्ड सहकारी यांनी परिश्रम घेतले.