राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता.पोलीस हवलदार कृष्णा देऊळकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे.दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली.तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात २९४,५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.