Just another WordPress site

“जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही,तर निधी देणार नाही”-नितेश राणे यांचा धमकी वजा इशारा

सिंधुदुर्ग-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल,त्या गावाचा मी विकास करेन.पण जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर निधी देणार नाही अशी धमकीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.कणकवलीत बोलताना नितेश राणे यांनी हे विधान केले आहे.आपण आता सत्तेत असून सगळे काही आपल्याच हातात आहे असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही.तितकी काळजी मी नक्कीच घेईन.आता याला हवे तर धमकी किंवा काही समजा.पण आपले गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा असा इशाराच नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

पुढे ते म्हणाले,सगळा निधी आता माझ्या हातात आहे.मग तो जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्रामविकास किंवा केंद्राचा निधी असो.मी सत्तेत असणारा आमदार आहे त्यामुळे पालकमंत्री,जिल्हाधिकारी,संबंधित मंत्री,उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.