Just another WordPress site

मिशन २०२४ नुसार भाजपा प्रादेशिक पक्षांशी युती करणार ?

आंध्रप्रदेश,बिहार,तामिळनाडू आणि हरियाणा या राज्यांमध्ये रणनीतीमध्ये बदल

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आगामी लोकसभा निवडणुक २०१४ च्या निडणुकीवर डोळा ठेवून भाजपाने नवीन रणनीती ठरविली असून मिशन-२०१४ नुसार भाजपा प्रादेशिक पक्षांशी युती करणार आहे.याबाबत प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्याचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालु आहेत .या मिशननुसार आंध्रप्रदेश,बिहार,तामिळनाडू आणि हरियाणा या राज्यांमध्ये रणनीतीमध्ये बदल करण्यात आला आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांच्यावर घराणेशाहीची राजकारण व भ्रष्टाचारी असल्याबाबत अनेकवेळा टीका केली होती परंतु नव्या रणनीतीनुसार भाजपला चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत युती करावीशी वाटतेय.याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्यासोबत चंद्रबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्यासोबत युतीची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तेलुगू देसम पार्टीने एनडीएच्या बाजूने मतदान केले होते त्यामुळे भाजपा व तेलुगू देसम यांच्यात जवळीकता निर्माण झाल्याचे चित्र आहे.आंद्रप्रदेश मध्येही सत्ताधारी वायएसआरसीपीसोबत युती करण्याबाबत उत्सुकता असतांना मात्र राजकीय अपरिहार्यतेमुळे ते शक्य होऊ शकले नाही.तामिळनाडूमध्ये ईपीएस व ओपीएस या पक्षांसोबत युती करून एकत्र येण्याच्या भाजपाच्या वतीने हालचाली  सुरु आहेत.तसेच हरियाणात देवीलाल यांच्या कुटुंबातील तीन गटांना एकत्र आणण्याचे प्रयत्न भाजपा कडून केले जात आहे.या घडामोडीत भाजप यशस्वी झाल्यास भाजपाला लोकसभा निवडणुकीतील विजयापासून कोणी रोखू शकणार नाही एव्हडे नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.