Just another WordPress site

सोलापुरात भाजपाचे आमदार विजय देशमुखांच्याही अंगावर शाईफेक

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

महापुरूषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात काळी शाई फेकण्याची घटना ताजी असतानाच सोलापुरात भाजपाचे माजी मंत्री आमदार विजय देशमुख यांच्याही अंगावर काळी शाई फेकण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. सोलापुरात आयोजित एका लग्नसमारंभात हा प्रकार घडला.या घटनेनंतर पोलिसांनी शाईफेकणाऱ्या तरुणाला पकडले आहे.

सोलापूरातील न्यू बुधवार पेठेत बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आमदार देशमुख गेले होते.त्यावेळी गर्दीत अचानकपणे लाल पोशाख परिधान केलेल्या एका तरूणाने महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सत्ताधारी भाजपाचे जबाबदार मंत्री व इतर नेत्यांवर कारवाई न करता सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आमदार देशमुख यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या घटनेमुळे सामूहिक विवाह सोहळ्यात गोंधळ उडाला.दरम्यान तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी संबंधित तारूणाला जागेवर पकडले.या घटनेनंतर आमदार देशमुख हे सुध्दा विचलित न होता अंगावरील शर्ट बदलून पुन्हा मोठ्या मनाने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.