दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.मात्र यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे.अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण देण्यात आले आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही आहे यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.वेदना होत आहेत,हे ऐकल्यानंतर. महाराष्ट्राचा चित्ररथ जेव्हा पथसंचलनालयात असतो तेव्हा आमच्यासारखा शिवसैनिक तो पाहण्यासाठी उत्सुक असतो.महाराष्ट्राच्या रथाचे वैशिष्ट्य की,तो नेहमी देशात पहिला येतो.नौदल आणि सैन्यदलाचे चित्ररथ पाहताना प्रचंड उर्जा मिळते त्यातच महाराष्ट्राचा रथ असल्याचा वेगळ अभिमान असतो असे अरविंद सावंत म्हणाले.
यंदा चित्ररथ नसल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेले.झोपलेत का हे सगळे जण.कसे सरकार चालले आहे बगा.सत्तेशिवाय दुसरा कोणता विषय नाही.सांस्कृतिक आणि सामाजिक दृट्या भाजपा महाराष्ट्र प्रदूषित करत आहे.त्यातून महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.प्रजासत्ताक दिनाला सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथांच्या माध्यमातून राज्याची संस्कृती,विकास आणि कला दाखवली जाते.हे चित्ररथ मर्यादित संख्येत काढले जातात.यासाठी एक समिती काम करते यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे.यापूर्वी २०२२ मध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता.आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्याची माहिती समोर आली आहे.