Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
चीन,जपान,साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे.हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे.सध्या औषधांची रुग्णालयात कमी असून तातडीने आरोग्य यंत्रणा सक्षम करा अशी मागणी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.विधान भवन परिसरात ते बोलत होते.टोपे पुढे म्हणाले चीनमध्ये सध्या टाळेबंदी लावण्यात आली.जगात करोनाचा नवा व्हेरियंटचा उद्रेक झाला आहे.आजपर्यंत देशात सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात बघायला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग,टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे.
सोबतच तत्कालीन सरकारने तालुका रुग्णालय स्तरावर उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटसह इतर यंत्रणांची तातडीने तपासणी करून देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे.राज्यात सर्वत्र आयसोलेश वॉर्ड सज्ज ठेवणे,औषधांची पूर्तता करणे,आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे तसेच तातडीने स्टेट टाक्स फोर्स गठित करण्याची आवश्यकता आहे.सोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे टोपे म्हणाले.