Just another WordPress site

मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून पतीने केला पत्नीचा खून

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना पेण तालुक्यातील देवर्षी नगर डोलवी येथे घडली आहे.या गुन्ह्याचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने भावाच्या मदतीने सदर महिलेनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता मात्र पोलिसांनी तपास करत या गुन्ह्याची उकल केली.वडखळ पोलीस ठाणे हद्दीत देवर्षी नगर डोलवी एका २५ वर्षीय महिलेनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली होती.या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती या प्रकरणाची चौकशी सुरु होती.या चौकशीत पत्नीचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची बाब उघडकीस आली आहे.

मयत महिलेने तिच्या लहान मुलाला थंड पाण्याने आंघोळ घातली या गोष्टीचा मनात राग धरुन पतीने तिच्या कपाळावर कोणत्यातरी कठीण साधनाने मारून अथवा कपाळ आपटून ठार मारले.खुन केल्याचा आरोप स्वत:वर येवु नये म्हणून भावाच्या मतदीने तीला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून लटकले.ही बाब पोलीस तपासात उघड झाल्यानंतर या प्रकरणी दोघांविरोधात भा.द.वी.कलम ३०२,२०१,३४ प्रमाणे २२ डिसेंबर रोजी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.