मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
करोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याचे व सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे तसेच सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील करोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी चीन,जपान,अमेरिका,ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत.चीनमध्ये करोना विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत करोना परिस्थितीचा आढावा घेतला.राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावाही यावेळी घेण्यात आला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन,आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत आदी उपस्थित होते.