Just another WordPress site

पंढरपूर कॉरिडॉर मुद्द्यावरुन थेट फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल?सुब्रह्मण्यम स्वामींचा इशारा

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजाकरण चांगलेच तापले आहे.वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चा विकास आराखडा तयार केला असताना हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे.हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.तर काहीजण कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याची भाषा बोलत आहेत असे असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कॉरिडॉरसंदर्भात ठाम असून काहीही झाले तरी हा कॉरिडॉर तयार होणारच असे सांगत आहेत.मात्र आता याच मुद्द्यावरुन थेट फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल असा इशारा भाजपाचेच माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी दिला आहे.विशेष म्हणजे स्वामींनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत हा इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की पंढरपूरचे कॉरिडॉर होणारच.कोणीही मध्ये आले तरी पंढरपूर कॉरिडॉर होणार असे ते म्हणत आहेत असे सांगत पत्रकाराने स्वामींना फडणवीसांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारला.त्यावर स्वामींनी,“मी आव्हान देऊन सांगतो की नाही होणार आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही असे म्हणत फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत मत मांडले.स्वामी यांनीही स्थानिक पदाधिकाऱ्यांप्रमाणे या कॉरिडॉरला विरोध करताना या कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना आणि कनेक्टीव्हीटीला प्राधान्य द्यावे असे स्वामींनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.आज स्वामींनी सोलापूर दौऱ्यावर असताना ही मुलाखत दिली.त्याची (कॉरिडॉर) काय घाई आहे कळत नाही.त्याऐवजी चंद्रभागा नदी स्वच्छ करा.इथं एखाद विमानतळ बांधा.या ठिकाणी किती लोकांना यायचे असते, महाआरतीमध्ये सहभागी व्हायचे असते.त्यांना धूळ मातीमध्ये यावे लागते त्यामुळे आधी ते करा त्यामुळे (विकासकामांमुळे)सर्व काही छान होईल नंतर कॉरिडॉरचे बघता येईल असे स्वामी म्हणाले.

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. परंतु हा आराखडा राबविताना विठ्ठल मंदिर परिसरासह अन्य भागातील मिळकती बाधित होणार असल्यामुळे संबंधित मिळकतदारांसह व्यापाऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी गठीत झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीने गेल्या १७ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात मोर्चा काढला होता.

या आंदोलनात सहभागी झालेले पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा दिला.पक्षाचे नेते,माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर कॉरिडॉरला यापूर्वीच विरोध करून त्याबाबतची निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिली आहेत.तरीही विकास आराखडा लादला जाणार असेल तर त्याची किंमत सत्ताधारी म्हणून भाजपाला चुकवावी लागेल.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीचे अध्यक्ष नाना कवठेकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट आणि जत कर्नाटकला जोडण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरवरही अन्यायाने हा प्रकल्प लादला जाणार असेल तर आम्हाला पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची मागणी करावी लागेल.त्यासाठी पुढील वर्षी आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या महापूजेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करावे लागेल असा इशारा दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.