Just another WordPress site

“१५ दिवसापूर्वीच शिझान व तुनिषा यांचे ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली”आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली आणि मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा धक्का बसला.तुनिषाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.एकीकडे हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे या प्रकरणात तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गंभीर आरोप करण्यात आलेत.शिझानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केले त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पण आता या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या नातेवाईकांनी ‘एएनआय’शी बोलताना तिचा कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत.शिझान तुनिषाला डेट करत असताना इतर मुलींच्याही संपर्कात होता.तो तुनिषाशी कमिटेड नव्हता त्यामुळे तुनिषा तणावात राहायची. १५ दिवसापूर्वीच शिझान आणि तुनिषा यांचे ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेली.

तुनिषा आणि शिझान यांच्या ब्रेकअपनंतर तिला याचा मोठा धक्का होता.‘इंडिया टीव्ही’च्या वृत्तानुसार १० दिवसांपूर्वीच तुनिषाला एंग्जायटी अटॅक आला होता.१६ डिसेंबरला तुनिषाला शिझान इतर मुलींशी संपर्क ठेवून आपली फसवणूक असल्याचे समजल्यानंतर ती खूप पॅनिक झाली होती आणि त्याचवेळी तिला एंग्जायटी अटॅक आल्याची माहिती तिच्या काकांनी दिली आहे.शिझानने आपल्याला दुसरे कोणीतरी आवडत असून तिच्याशी नात्यात असल्याने तुझ्याशी नाते तोडत आहे असे कारण देत तुनिषाशी ब्रेकअप केले होते असेही तिचे काका पवन शर्मा म्हणाले आहेत.दरम्यान सध्या सब टीव्ही मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिषा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती.तुनिशा ‘फितूर’,‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती.तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.