नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबची एक ऑडिओ क्लिप सापडली आहे.या ऑडिओ क्लिपमध्ये आफताब आणि श्रद्धाचे भांडण रेकॉर्ड झाले आहे.ऑडिओ क्लिपमध्ये दोघे वाद घालत असल्याचे ऐकू येत आहे.इतकेच नाही तर आफताब श्रद्धाचा छळ कर असल्याचेही व्हिडीओतून सिद्ध होत आहे.दिल्ली पोलिसांच्या मते हा एक मोठा पुरावा ठरु शकतो.या ऑडिओ क्लिमुळे आफताबने श्रद्धाची हत्या नेमकी का केली यामागील कारण समजू शकते असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पोलीस ऑडिओ क्लिपमधील आवाज आफताबचाच आहे का याची खात्री करण्यासाठी चाचणी करणार आहे.सीबीआयची सीएफएसएल पथक आवाजाचा नमुना घेणार आहे.आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे.सीबीआय आज त्याला तिहार जेलमधून घेऊन जाणार आहे.आरोपी आफतबाची नार्को टेस्ट झाली आहे.याआधी त्याची पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली होती.
वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली होती.आरोपी प्रियकर आफताब पूनावाला याने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले होते.सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आले.कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते.चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले होते.मृतदेहाची विल्हेवाट लावण कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचे ठरवले यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली.आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असे त्याने सांगितले होते.आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला होता. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले होते.
मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले होते.सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता.रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे.रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे.कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे.मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते.मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता.तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली.श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसेच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचे आढळले.याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते.ती भांडण करुन घरातून निघून गेली पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही असे त्याने पोलिसांना सांगितले पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली.पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला.यानंतर पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या.