राजपूरमधील धर्मसंसदेत बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आले होते.महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज यांना अटकही झाली होती.त्यातच आता पुन्हा कालीचरण महाराज यांनी केलेले आणखी एक विधान चर्चेत आले आहे.देशात ४६ कोटी लोक मुस्लीम आहेत त्यामुळे येणाऱ्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा कालीचरण महाराज संबोधित करत होते.देशात ६० टक्के महिला मतदानाला जात नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मुस्लीम महिला होणार आहात आपले राहणीमान आणि मुस्लिमांचे राहणीमान यात जमीन-आसमानचा फरक आहे असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.
देशात १४० करोड जनता आहे त्यात ९४ करोड हिंदू आहे तर ४६ करोड हे मुस्लीम आहेत त्यामुळे येणारा दहा वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल.महिलांना बुरख्यात राहावे लागेल असे कालीचरण महाराज म्हणाले.आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत.आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत त्यामुळे आपण त्यांची पूजा करतो.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,गुरुगोविंद सिंह महाराज,राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?असा सवाल उपस्थित करत “देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही,”असे वक्तव्यही कालीचरण महाराज यांनी केले आहे.