Just another WordPress site

“हिंदूंनी घरात शस्त्र बाळगली पाहिजेत?”प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वक्तव्य

भोपाळ-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

हिंदूंनी घरामध्ये शस्त्र बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.कर्नाटकात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येविषयी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखेच उत्तर दिले पाहिजे.आपल्या घरात हिंदूंनी शस्त्र बाळगलीच पाहिजेत असेही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे.लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखेच उत्तर दिले पाहिजे.आपल्या मुलींवर संस्कार घडवा.आपल्या मुलींना गोष्टी समजावून सांगा.एवढंच नाही तर हिंदूंनी आपल्या घरांमध्ये हत्यारे बाळगली पाहिजेत.काहीही नसेल तर भाजी कापण्याच्या सुरीला धार लावून घ्या.स्पष्टच सांगते आहे की आपल्या घरातले चाकू, सुरे जे आपण भाजी कापायला वापरतो ते धारदार असले पाहिजेत.त्यांनी चाकू भोसकून आपल्या हर्षावर हल्ला केला.त्यांनी चाकू सुऱ्यांनी भोसकून बजरंग दल,भाजपा,भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जीव घेतला आहे.आता शस्त्रांना धार करण्याची वेळ आपली आहे.माहित नाही कधी आवश्यकता भासेल जर आपल्या घरातली भाजी व्यवस्थित कापली गेली तर आपल्या शत्रूची जीभ आणि त्याचे शीरही आपल्याला प्रसंगी कापता येईल.

प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या भाषणात शिवमोगा येथील हर्षासह हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनांकडेही आपल्या भाषणांत लक्ष वेधले.आपले रक्षण करायचे असेल तर हिंदूंनी घरात सुरी किंवा चाकू बाळगलेच पाहिजेत.आज भाजी कापण्यासाठी वापरली जाणारी ही साधने उद्या शत्रूला उत्तर द्यायला कामी येतील असेही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.आपल्या घरात घुसून कुणी हल्ला केला तर त्याला जशास तसे उत्तर देणे हा आपला अधिकार आहे असेही प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.लव्ह जिहाद सारख्या घटना घडतात त्याला जशास तसे उत्तर द्या.त्यांच्याकडे (मुस्लिम समाज) जिहादची परंपरा आहे त्यामुळेच ते लव्ह जिहाद करतात.प्रेम असले तरीही ते त्यातही ते जिहाद करतात.आपण (हिंदू) सुद्धा प्रेम करतो आपण देवावर प्रेम करतो.प्रेम ही आपल्यासाठी चांगली भावना आहे असेही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.