देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही असे वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले होते.त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी आम्हाला नको त्या गोष्टी शिकवू नये असे ते म्हणाले.नागपूरमध्ये टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.कालीचरण हा काही कॅबिनेट मंत्री नाही तो एक व्हाह्यात माणूस आहे.कालीचरणला हिंदू धर्माबद्दल एवढी आस्था असेल तर त्याने हिंदू मुलांच्या रोजगाराबाबत बोलावे,हिंदू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यावर बोलावे अशी संतप्त प्रतितिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.कालीचरणने ज्या भाषेचा वापर केला आहे त्यावरून या व्यक्तीमध्ये संताचे कोणतेही गुण दिसत नाही असेही ते म्हणाले.
साध्वी प्रज्ञा असेल किंवा कालीचरण असेल अशा लोकांना महत्त्व देऊ नये.हा काही खूप मोठा व्यक्ती नाही.एवढी त्याच्यात धमक असेल तर त्याने पाकिस्तान सीमेवर लढायला जावे.चीनच्या बॉर्डवर जावे,त्यांच्याशी दोन हात करावे.मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी आम्हाला नको त्या गोष्टी शिकवू नये अशी टीकाही त्यांनी केली.अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना,“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत.आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो.छत्रपती संभाजी महाराज,गुरुगोविंद सिंह महाराज,राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?त्यामुळे देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही असे विधान कालीचरण महाराज यांनी केले होते.