Just another WordPress site

“पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर मुख्यमंत्री कोणती कारवाई करणार?जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

शिंदे गट आणि भाजपामधील वाचाळवीर आमदारांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती.यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले होते.त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.या व्हिडीओत दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण करत आहे.माझा नग्न फोटो टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलेत.आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार?त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.अनंत करमुसे प्रकरण आणि एक महिलेने विनयभंगाचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.त्यातच दादा भुसे यांचा व्हिडीओ समोर आल्याने मुख्यमंत्री आता कोणती कारवाई करणार असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात.शिव्या देतात… मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस दाखल करणार?माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत.सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केली.सर्वोच्च न्यायालयात रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली.आता बोला.माझ्यासाठी वकिलांची मोठी फौज आणि पोलिसांची खोटी प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात द्यायला लावली.मी सराईत गुन्हेगार आहे असे पोलीस सर्वोच्च न्यायालयात पत्र देतात…वाह साहेब आपण मला फाशी देऊ शकत नाही किंवा मुडदाही पाडू शकत नाही असे आव्हाड यांनी म्हटले आहे.माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला जिने रात्री आपली भेट घेतली तिच्याविरोधात जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे.आपण माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचलत.आपण मित्र होतो… विसरलात असा प्रश्न आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.