Just another WordPress site

“भालोद येथील बौद्ध वस्तीवर जातीयवाद्यांकडून हल्ला”घटनेचा सर्व थरातून निषेध

महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक 

पोलीस नायक न्यूज 

यावल तालुक्यातील भालोद येथे महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणा सोबत झालेल्या वादात सोडवासोडव केल्याचा राग म्हणून रावेर
तालुक्यातील सावदा,कोचूर,न्हावी,फैजपूर,चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाठ्या काठ्या,लोखंडी रॉड,फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला जवळपास ६० ते ७० लोकांनी अचानकपणे भ्याड हल्ला केल्याने सर्वत्र
पळापळ सुरू झाली यात अनेक जण जखमी झाले असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.आशुतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला १० ते ११ टाके बसलेले आहे तर रोहित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.२७डिसेंबर २२ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद येथील बौद्ध वस्तीवर ललित सुनील वाणी,भूषण नेमाडे,चेतन सोनवणे,प्रशांत सोनवणे,हेमंत दिलीप पाटील सर्व राहणार न्हावी,ता-यावल,भास्कर चौधरी,गणेश उर्फ देवा देवकर राहणार सावदा ता-रावेर,कल्पेश पाटील,सुनील संतोष चिमणकर,पवन सुतार सर्व राहणार कोचुर,ता-रावेर,भूषण जाधव,नीरज झोपे,रितेश चौधरी,शिवम बाविस्कर राहणार सावदा,इंद्रजीत पाटील,मयूर भारंबे,शुभम भारंबे सर्व राहणार फैजपूर ता-यावल व त्यांच्या सोबत जवळपास ३० ते ४० जणांनी हल्ला चढविला या हल्ल्यांमध्ये आशुतोष अशोक भालेराव वय २१ वर्ष तसेच रोहित मधुकर लोखंडे वय २० वर्ष दोघे राहणार भालोद हे गंभीर जखमी झाले यापैकी रोहित लोखंडे याची प्रकृती चिंताजनक असून ते जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
यादरम्यान भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्या मध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग मनात आल्याने वरील जातीयवादी मानसिकतेच्या मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाठ्याकाठ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून अनेकांना जखमी केले.यात रोहित लोखंडे याला डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत करून”हे महारडे खूप जास्त मातले आहेत यांना धडा शिकवावा लागेल”अशा प्रकारची जातीयवाचक शिवीगाळकरून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.या जातीयवाद्यांची मुजोरी इथवरच थांबली नाही तर ज्या महिला आपल्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यांनाही
मारहाण करून त्यांच्या सोबत अश्लील वर्तन करण्यात आले.आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी त्यांच्या हातातील
कोणत्या तरी हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेले साक्षीदार सुलभा मधुकर लोखंडे,उज्वला अशोक भालेराव,संगीता रुपेश भालेराव यांना सुद्धा वरील आरोपी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारले.तसेच सुलभा मधुकर लोखंडे यांचे ब्लाउज पाडून तिला लज्जा
वाटेल असे कृत्य केले.वरील गुन्ह्या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध र.नं २२४/२०२२ भा.द.वि कलम १४३,१४७,१४८,१४९, ३२६,३२४,३५४,३२३,३३७,५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१६ चे कलम तीन ३(१)(आर)(एस)(३)(१)(डब्लू) (आय) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर डॉ.कुणाल कुमार सोनवणे हे करीत आहे.सदरील भ्याड हल्ल्याचा विविध राजकीय व सामाजिक संस्था,संघटना तसेच सर्वच थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.