ज्या महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिले,ज्या मराठेशाहीने हिंद प्रांतावर राज्य केले त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज अत्यंत बिकट आहे.ती पाहिली की वाईट वाटते.पुण्यातल्या व्य़ाख्यानमालेत राज ठाकरे यांनी ही खंत व्यक्त केली.महाराष्ट्राच्या राजकारणात तरूणांना यावेसे वाटत नाही त्यांनी ही मानसिकता बदलली पाहिजे असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता,मी थोबाडाला आवर घालून बोलावे अशी इच्छा असावी असे राज ठाकरे म्हणाले कारण मला व्याख्यान आणि भाषण यातला काही फरक कळत नाही.बाकी राज्यात राजकारण कसे चालले तुम्ही रोज बघताच आहात.काय काय चाललय?बोलण्याची पद्धत कशी आहे.प्रवक्तेही कसे बोलतात तुम्ही पाहात आहात.ऐकूच नये,पाहूच नये अशा गोष्टी सुरू आहेत.अनेक टेलिव्हिजन चॅनल्सचा वाटा असतो त्यामुळे ते तुला काय वाटते,तुला काय वाटते?हे सुरू राहते आणि मूळ विषय बाजूला राहतात.मी माझ्या बोलण्यात शिव्या देऊ नये म्हणून व्याख्यान असे नाव दिले गेले असेल.
ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिले,हिंद प्रांतावर मराठेशाहीने राज्य केले त्या महाराष्ट्राची आजची अवस्था पाहिली की वाईट वाटते.कधी कधी असे वाटते की आपण कुठे फऱफटत चाललो आहे.१९९५ च्या आधीचा महाराष्ट्र,९५ नंतरचा महाराष्ट्र असा एक लेख लिहावा असे माझ्या मनात आहे.आज पुण्याचीच अवस्था तुम्हीच बघा.चार-चार पुणे शहर वसली आहेत.मी अनेकदा बोललो आहे की मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला,पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही.तो वेग आपल्या आयुष्यात आला,आपल्या डोळ्यांना,कानांना वेग कुणी दिला असेल तर एम टीव्हीने दिला.तो वेग घेऊन आपण पुढे आलो.त्या वेगात,त्या काळात सगळच बदलले.चित्रपट,नाटक,साहित्य सगळ बदलले.बदल गरजेचा असतो हे मला मान्य आहे पण तो बदल जिवावर उठणारा असेल तर काय करायचे?९५ च्या आधीचा काळ बघा तुम्ही सर्व पक्ष,संघटना हे उच्च मध्यमवर्गीय.त्यानंतर मध्यमवर्गीय अशी एक सांगड घातलेली होती.त्यानंतर नको ते राजकारण अशी मानसिकता तयार होत गेली. राजकारणाला तुच्छ मानायला लागणारा मोठा वर्ग तयार झाला.श्रीमंत,उच्च मध्यमवर्गीय,गरीब प्रत्येक वर्गात विचार करणारे लोक आहेत पण ते विचार करणारे लोक मागे जायला लागले आणि सगळा स्तर घसरायला लागला.१९९५ च्या आधी होणारा भ्रष्टाचार आणि त्यानंतर होणारा भ्रष्टाचार यात जमीन आस्मानाचा फरक आहे.मला काहीही करता आले नाही म्हणून मी राजकारणात जाणार ही मानसिकता वाढली. सुशिक्षित असताना जर सूज्ञ पणा नसेल तर ती काही उपयोग होत नाही.
तुमचे संपूर्ण आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राजकारणाला बांधलेले आहे.दुधाचे भाव राजकारणी ठरवतात,पाणीपट्टी नगरसेवक,महापालिका ठरवते.विजेचे दरही जे ठरवले जातात ते तुम्ही निमूटपणे भरता.काही प्रश्न विचारत नाही.आमदार,खासदार मोठे बोर्ड लावतात.आमदार संपर्क कार्यालय.अरे कोण करणार संपर्क कारण समोर येते आहे ते तुम्ही सहन करत आहात.ते राजकारण गलिच्छ आहे असे आपण म्हणतो त्यामुळे अनेक तरूण मुले,मुली परदेशात जातात.इथे राहातच नाहीत.तुमचे शांत आणि गप्प राहणे,तुमचे सहकार्य या राजकारणात नसणे यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर बरबाद होतो आहे हे आपण शांतपणे पाहतो आहोत.आत्ताची महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की राजकारण नासवले जात आहे.इथे लोक मोठे झाले,उद्योजक झाले हे सगळे जाणीवपूर्वक नासवले जात आहे.महाराष्ट्रातले लोक शांत बसले आहेत.आम्हाला राजकारणात यावेसे वाटत नाही.विधानसभेत होणाऱ्या चर्चा तर मलाही ऐकवत नाही.बाहेर आल्यानंतर जे काही बडबड करतात ती तर अजिबात ऐकवत नाही.मग मला प्रश्न पडतो की आपला महाराष्ट्रातला मराठी का गप्प बसला आहे?तो या सगळ्या गोष्टींच्या विरोधात सारासार विचार करून बोलत का नाही?असाही प्रश्न राज ठाकरेंनी आपल्या व्याख्यानात विचारला आहे.
“श्री.महेंद्र काशिनाथ पाटील वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांची पोलीस नायक न्यूज पेपर च्या मुख्य उपसंपादकपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे.महेंद्रभाऊ यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!!”
मुख्य संपादक
श्री.बाळासाहेब व्ही.आढाळे.
पोलीस नायक न्यूज पेपर
(भारत सरकार)